अजराज अजिंक्य 'युवराज' क्रिकेट बोटावर मोजणाऱ्या अवघ्या काही देशात खेळला जातो पण या खेळाने इतके उतुंग अवलीये दिले आहेत ज्यामुळे खेळाचे श्रेष्ठत्व अबाधित राहिले आहे. काळानुरूप प्रकार बदलणाऱ्या या खेळाने माचो, जेटलमन, पुस्तकी किडे, पुस्तकाच्या बाहेर 360 विश्व दाखवणारे, पारंपरिकता जपणारे अनेक लेजन्ड दिले आहेत त्यात संख्येने कमी असणाऱ्या डावखुऱ्यांचा वाट कणभर जास्तच. डावखुऱ्या फलंदाजांना निसर्गतः एक विशिष्ट देणगी लाभली असावी कारण जेवढे स्टायलिश फलंदाज मोजु त्यात प्राधान्याने डावे आले. अगदी धुतलेल्या तांदळात खडे काढावे तितकेच स्टायलिश उजवे मिळतील. आक्रमकता, अविश्वसनीय फटक्यांची खाण बहुदा डाव्यांच्या ओंजळीत टाकताना देव मधुर रसपान करत असावे. अगदी सर गॅरफील्ड सोबर्स पासून, कलाईव्ह लॉयड, अॅलन बॉर्डर, डेव्हिड गोव्हर, ब्रायन लारा, विनोद कांबळी, सनथ जयसूर्या, ऍडम गिलख्रिस्ट, कुमार संघकारा, सईद अन्वर, आपला दादा, बेव्हन अशी कितीतरी नावे आहेत. महानतेच्या बाबतीत नक्कीच सचिन लारा पेक्षा श्रेष्ठ असेल पण लाराच्या खेळाने चक्षु कणभर जास्तच तृप्त होतील. अशा या डाव्यांच्या माळेत भारताचा एक मोती ठाण...