'अँड थ्रो टू द फायनल'
का हरलो कसे हरलो ही प्रश्ने सध्या गौण आहेत पण फाईट देऊन हरलो जिंकण्यासाठी सर्वस्व देत हरलो. 28 वर्षानंतर मिळवलेला विश्वकप पुन्हा इतक्या लवकर आणि सहज मिळवायला आपण काही ऑस्ट्रेलिया नाही पण क्रिकेटच्या पठारावर आपण नवीन महासत्ता म्हणून विश्वास मिळवायला लागलो होतो. ज्याप्रमाणे सुरवात केली लीग मध्ये टॉप राहिलो त्यामुळे हा वर्ल्डकप आपलाच वाटायला लागलेला. त्यात कधी नव्हे ती जगात सर्वोत्तम अशी बॉलिंग लाभली. हॅट्ट्रिक घेणारा शमी टीमच्या बाहेर, कुलदीप बाहेर म्हणजे आपली गोलंदाजी खतरनाकच. त्यामुळे रविवारी होणाऱ्या फायनलची तिकिटे एव्हाना भारतीयांनी घेऊन ठेवली कारण भारत न्युझीलंडविरुध्द हारेल असे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी सांगितले असते तरी कोणीच विश्वास ठेवला नसता. आमच्या कॉलनीत कॉलेज मधला प्रोजेक्टर आणुन रविवारी फायनल बघण्याचा चंग बांधला होता. त्यात काल न्यूझिलंडच्या फक्त 211 च धावा झालेल्या आणि ज्या फॉर्ममध्ये रोहीत शर्मा होता ते पाहून त्याला आणखी एका शतकाची ओढ लागली होती त्याही पेक्षा विराटचे हुकलावणी देणारे शतक पाहण्यासाठी डोळे आसुसले होते. पण कशाचे काय, सुरुवातीची चाळीस मिनिटे आणि होत्याचे नव्हते झाले पत्याच्या बंगल्याप्रमाणे आमच्या मनातील विश्वकपचा डोलारा कोसळत होता पण तरीही एक आशा होतीच 'महेंद्रसिंग धोनी'. आत्मविश्वास नव्हता कारण धोनीचा अलीकडचा फॉर्म त्याच्यावरच बॉउन्सर टाकत आहे (यॉर्कर म्हटले असते पण यॉर्कर वर धोनी हेलिकॉप्टर मारतो म्हणजे मारायचा असो). पण शेवट पर्यंत आशा होती 'कदाचित हार न मानण्याची भारतीय मानसिकता असल्यामुळे'. कार्तिक पंड्या आणि पंत रोखता न आलेले शॉट खेळल्यामुळे आऊट झाल्याने फक्त शेपूट गुंडाळणे तेवढेच किवीला करायचे होते. भगदाड पडावे अशी आपली फलंदाजी ड्रेसिंग रूम मध्ये परतली. आता धोनीची साथ द्यायला आला 'सर रविंद्र जडेजा'. परवाच त्या मांजरेकर ने केलेल्या टीकेमुळे जडेजाने आज आपले सगळे कौशल्य पणाला लावले. दोन वर्षापूर्वी पांड्याला रन आऊट केल्यानंतर शिव्यांची लाखोली खाणाऱ्या जडेजाने तीच पांड्याची इंनिंग पुढे कंटिन्यू केली. किती आत्मविश्वासाने तो फलंदाजी करत होता. बहुदा इंग्लंड किंवा न्यूझिलंड विरुध्दच खेळण्यासाठी त्याने बॅटिंग शिकली असावी कारण इथे तो नेहमीच चांगला खेळतो. काहीवेळा यष्टीरक्षकापासून तर काही वेळा नो मेन्स लँड मध्ये चेंडू पडत होता. भाग्यविधात्याच्या हातून जेऊन आल्याप्रमाणे त्याने हात लावील ते सोने होत होते. सकाळी केलेले रन आऊट, अप्रतिम कॅच आणि आताची बॅटिंग खरा 3D शो चालू होता (सांगा त्या शंकरला).
सिंगल्स डबल्स घेत माही पण चांगली साथ देत होता. वेल कॅलक्यूलेटेड रिस्क प्रमाणे स्कोर पुढे जात होता. एव्हरेस्ट सर करण्यासाठी हळुवारपणे घेतलेला सावध पवित्रा आता झेप घेण्यासाठी सज्ज झालेला. 17 मध्ये 133, 11 मध्ये 99, 8 मध्ये 72, 5 मध्ये 52, 3 मध्ये 37 इथपर्यंत सगळं कसं छान चाललेलं. एव्हाना धोनीचे हेटर्स पण त्याच्या खेळाची दाद द्यायला लागले आणि जडेजा तर सर्वांचा हिरो झाला. आम्ही एका जागेवर सामना पाहत होतो एका अविश्वसनीय अध्यायाचा शेवट पाहण्यासाठी पूर्ण भारतवर्ष स्तब्ध होते पण म्हणतात ना माशी शिंकते ते विपरीत होण्यासाठीच, चतुर विल्यमसनने गोलंदाजीसाठी बोल्टला आणले. पहिल्या चार बॉल मध्ये पाचच धावा निघाल्या. कॉमेंट्री करताना लक्ष्मण (का कोण नक्की आठवत नाही) म्हटला 'आकाश मुझे लग रहा है इस बॉल पे चौका आयेगा' आकाश चोप्रा लगेच बोलला
'नही पाजी मेरे तो दिल की धडकने बढ गयी है, कुछ अलग होगा! पर हा सारी भारतीयोकी तरह मुझे भी लग रहा है चौका आना चाहीये' (कॉमेंटेंटर्स कृष नाही म्हणणार) आणि पुढच्या बॉल ला जडेजा आऊट.
मॅच संपला असेच वाटायला लागले कारण धोनी फक्त सपोर्टिंग रोल करत होता पण धोनी धोनी आहे आणि तो मॅच जिंकून देणार अशी आशा (परत) होती... भाबडी. आज धोनीने मॅच काढला तर त्याच्या हेटर्सने लावलेले सगळे अपराध माफ होणार होते. मेंदूची आणि मनाची आपसात लढाई चालू झाली आणि धोनीने फर्ग्युसनला षटकार लगावला, मनाने मेंदूवर विजय मिळवण्यास सुरवात केली. लक्ष अवघड होते पण पुढचा ओव्हर निशमचा आहे हे धोनीच्या लक्षात होते पण दुक्का घेण्याच्या नादात सगळा खेळ संपला. 'अँड थ्रो टू द फायनल' ही इव्हन स्मिथची कंमेंटरी सगळी सांगून गेली. विश्वकप मधील सगळे अपयश पुसणारा तो थ्रो मार्टिन गप्टीलने लगावला. धोनी एक शतांश सेकंड मागे राहिला आणि बघता बघता स्टेडियम मध्ये एक सन्नटा पसरला. किवीज खेळाडू जिवाच्या आनंदाने गप्टीलकडे पळाली कारण त्या एका थ्रो ने फायनल चे तिकीट बुक केले 'सलग दुसऱ्या वर्षी' (भारतीय फॅन्स मात्र आता किवीजला फायनल मध्ये सपोर्ट करतील फक्त त्यांचा लंका न होता ऑस्ट्रेलिया व्हावा हीच अपेक्षा).
जड अंतःकरणाने पॅव्हेलीयन कडे येणाऱ्या धोनीला पाहताना खरंच उर भरून आला. मेंदूने हार मानली असली तरी मन विश्वास ठेवत नव्हते ते आपले कारण देतच होते, धोनी रन आऊट नसता झाला तर मॅच जिंकला असता पण आता परत चार वर्षे वाट पाहावी लागणार आणि त्यावेळी धोनी नसणार, एका पर्वाचा शेवट होत होता!
ह्या विश्वकप मध्ये धोनी खूप छान खेळला. काल टेलर आणि विलीयमसन विकेट गेल्यावर खूप कमी स्ट्राईक रेट ने खेळले पण म्हणून किवीसमर्थकांनी त्यांच्यावर टीका नाही केली पण तशीच खेळी धोनीने विंडीज विरुद्ध केल्यावर किती टीका झाली. अफगाणविरुध्दचा सामना सोडला तर माहीचा फॉर्म खूप चांगला होता धोनी हा त्या मोजक्या खेळाडू मध्ये येतो ज्याने क्रिकेटला नवीन व्याख्या दिली. कॅप्टन यष्टीरक्षक आणि फिनिशर म्हणून त्याची जागा कधीच भरून निघणार नाही. क्रिकेटच्या विश्वातील सगळ्यात मोठा जिनियस ही उपाधी त्याच्या पुढे शानने मिरवत राहील आणि पुढच्या कित्येक पिढ्या त्याच्या पराक्रमाच्या गोष्टी मिरवत राहतील. कितीतरी छोट्या शहरातील खेळाडू त्याच्या पावलावर पाऊल टाकत आहेत. दडपणाखाली खेळ, चपळ यष्टीरक्षक आणि कूल माईंडने गेम चेंज करणारा कॅप्टन कुल आता परत खूप काळ भेटणार नाही.
माहीत नाही माही किती दिवस खेळेल का हाच त्याचा शेवटचा सामना होता पण तो 'फैरवेल मॅच' खेळून निवृत्त व्हावा कारण सचिन नंतर भारताचा सगळ्यात मोठा आयकॉन आहे तो. त्याच्यासाठी जीव लावणारा त्याचा फॅनबेस खूप मोठा आहे आणि त्यांच्यासाठी निदान एक सामना तरी त्याला खेळवाच लागेल.

Comments
Post a Comment