"समाधी सोहळा श्री दामाजी अप्पा"
महाराष्ट्रात सांस्कृतिक दृष्ट्या भागवत धर्माचे कार्य फार मोठे आहे. या भागवत धर्माचा पाया संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी घातला
'ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालेसे कळस।।'
संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य जनतेच्या अंतकरणावर वारकरी पंथाचा पगडा बसवला व वैदिक धर्माचे तत्वज्ञान आपल्या अमृत मधुर वाणीने सांगुन सामान्य माणसाच्या निसत्व जीवनाला अध्यात्माची जोड मिळवून दिली. विठ्ठलावर श्रध्दा असलेला हा वारकरी संप्रदाय आषाढी कार्तिकेला नित्यनेमाने पंढरपूरला जातो.
'पंढरिचा वारकरी वारी न चुकू दे हारी।'.
आणि ह्याच भक्तीला पुढे करत संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गोरोबा काका, संत जनाबाई या संतानी तेराव्या शतकात समाज प्रबोधनाचे कार्य केले. हीच संत परंपरा सतराव्या शतकात संत तुकाराम, संत एकनाथांनी कळसापर्यंत नेली.
याच काळात परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात 'गोदावरी' नदीच्या काठावर असलेल्या 'आरखेड' या लहानश्या टुमदार गावात 'संत दामाजी अप्पा उदयास आले.
आरखेड हे गोदावरी व गळाटी नदीच्या निसर्गरम्य संगमावर वसले आहे. पश्चिमेस 20 फुटाची उंच टेकडी, जवळच जागृत मारुतीचे मंदिर असणारे गोदावरी नदीच्या पात्रातील जांभुळबेट. अशा नयनरम्य परिसरात संत दामाजी अप्पा यांचा जन्म शके 1540 मार्गाशीष शु. पौर्णिमा इ.स. 1618 मध्ये झाला.
त्यांच्या वडिलांचे नाव कुसनाजी आप्पा व आईचे नाव गंगाबाई होते. कुसनाजी अप्पा विठ्ठलाचे निस्सीम भक्त होते त्यांचा व्यवसाय मातीचे मडके बनवुन त्यावर उदरनिर्वाह चालत असे आणि या भागवत भक्तच्या उदरी दामाजी अप्पाचा जन्म झाला. कुसनाजी अप्पा आणि गंगाबाई यांच्या उदरी रसाळ, गोमटे असे सुंदर मूल जन्माला आले.
'शुध्द बीजपोटी फळे रसाळ गोमटी।
मुखी अमृताची वाणी देह देवाचे कारणी।।'
लहानपणापासून विठ्ठलाचे नामस्करण करत संतकाका गोरोबांना आदर्श मानत वडीलाप्रमाणे मातीचे मडके बनवत जीवन व्यत्तीत करत होते.
'हेची थोर भक्ती आवडती देवा। संकल्पावी माया संसाराची।।'
तुकाराम महाराजांच्या या उक्तीप्रमाणे अप्पानी संसाराचा संकल्प करुन परमेश्वराच्या चिंतनात आवडीने रममाण व्हायचे ठरवले. कारण भक्ती हे श्रेष्ठ आहे, भक्तीमुळे मन व इंद्रिये एकत्रित येऊन त्यांच्यामध्ये प्रबळ शक्ती निर्माण होते आणि याच शक्तीच्या सामर्थ्यामुळे चमत्कार दाखवता येते.
एकदा दामाजी अप्पा मडके विकण्यासाठी गोळगाव इथे गेले. तिथे मडके विकण्यासाठी उशीर झाल्यामुळे त्यांचा मुक्काम पडला , रात्री अचानक मुसळधार पाऊस पडल्यामुळे गोदावरीला पूर आला तेव्हा सकाळी नदीच्या अलीकडे कसे यायचे हा प्रश्न निर्माण झाला. दामाजी अप्पा नदीच्या काठावर आले व पांडुरंगाचे चिंतन करुन खांद्यावरील धोतराची घडी करुन नदीच्या पात्रात सोडली आणि त्यावर बसुन विठ्ठल नामाचा जप करत आरखेड इथे परतले.
'पावनाचा वारीका वळघे। वाले तरी उदकी पाऊल न लगे।।
येणे येणे पसंगे। येते बहुदा सिध्दी।।'
भक्तीच्या योग सामर्थ्यामुळे भक्त वाऱ्यावर स्वार होतो पाण्यावर चालतो. ज्ञानेश्वरांनी सांगितल्यामुळे योगी पुरुषाला सर्व काही सिध्दीस नेता येते. वडिलांच्या नंतर आषाढीची पंढरीची वारी दामाजी अप्पांनी चालु केली. पंढरपुर मध्ये किर्तन, भजन, टाळ, मृदंग या निनादाने दामाजी अप्पा मंत्रमुग्ध व्हायचे.
गावाच्या पश्चिमेस विठ्ठलाचे मंदिर उभारले व टेकडीवर एक झोपडी केली त्यातुन गोदावरीचे दर्शन करत पांडुरंगाची सेवा करायचे. दामाजी अप्पांची पत्नी पतीप्रमाणे भगवंताचे नामस्करण करणारी, साधू संतांची सेवा करणारी साध्वी पतिव्रता होती.
'साधुसंत येता सदनी। तयासी हरिरुप मानी।।
अन्न देतेसी प्रार्थुनी। सप्रेम होवो निचित्तात।।
सतराव्या शतकात राज्यराज्यात अनेक चकमकी होत असत अशीच एक शतकाच्या उत्तरार्धात भाग्यानगर इथे झाली. भाग्यानगर येथील अविंध राजा उन्मत झाला होता. लोकांवर अत्याचार करणे विठ्ठलाचे मंदिर उध्वस्त करणे हे त्याचे नित्याचेच. तेव्हा ही वार्ता पुणे येथील राजाला समजली. सोबत कुंज, अश्वदळ घेत सरदार भाग्यानगर येथे आले. नगारावाजवून युध्दाला सुरवात झाली. युध्दात अविंध राजा पराभुत झाला त्याचे सैन्य सैरावैरा पळत सुटले अन्न पाण्यासाठी ते त्रस्त झाले. पळत पळत ते गोदावरी नदी काठी आरखेड इथे आले. नदीचे पाणी पिऊन ते तृप्त झाले पण या क्षुधित सैन्याला अन्न हवे होते. एव्हना भयभीत गावकरी दारे खिडक्या बंद करून शेताला पळुन गेली होती. अन्नाचा शोध घेत मंडळी दामाजी अप्पांच्या पर्णकुटीत आली. संतांनी त्यांचे स्वागत केले आणि काय हवे विचारले. क्षुधित सैन्याने अन्नाची मागणी केली.
"विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म। भेदोभेदी भ्रम अमंगळ।।"
सर्वजग विष्णुरूपी आहे आणि त्यांना जेऊ घालणे आपले आद्यकर्तव्य आहे ही संतांची भावना. पण दामाजी अप्पांची परिस्थिती प्रतिकूल होती आणि सर्वाना जेऊ घालणे त्यांना शक्य नव्हते. पण देव पाठीशी असल्यास संतांना काय अशक्य! विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन शुध्द भावनेने परमेश्वराचा धावा केला.
'धाव घाली आई आता पाहतीस कायी।
धीर नाही माझे पोटी झालो वियोगे हिंपुटी।।'
दामाजी अप्पांची तळमळ पाहुन विठ्ठलाने अदभुत शक्ती प्रकट करण्याचा साक्षात्कार दिला. गोदावरीमातेने व पांडुरंगाने प्रसन्न होऊन भक्तीची शक्ती दाखवण्याचे सामर्थ्य अप्पांना दिले आणि दामाजी अप्पांनी वाळुचा भात व पाण्याचे तूप बनवले.
"आधणी घातलीया हरळ होती अमृताचे तांदुळ।
जरी भुकेची राही वेळा श्री जगन्नाथा।।"
ज्ञानेश्वरांनी रचलेल्या अभंगाची साक्ष घेऊन दामाजी अप्पांनी सैन्याची भूक भागवली. तरी अवंध सैन्याचा अहंकार गेला नव्हता त्यांनी दामाजी आप्पांना ओझे वाहून नेण्यास दोन मनुष्य पाहिजे नसता या निर्मनुष्य स्थळी दामाजी अप्पांना ओझे वाहण्यास सांगितले.
'ओझे देते मस्तकावरी ऐसे देखोनी श्रीहरी।
गुप्तते येऊन झडकरी उचलले वरचेवरी।।'
अविंध सैन्य आश्चर्यचकित होऊन अप्पांच्या चरणी लिन झाले. दामाजी अप्पांच्या सानिध्यात त्यांच्यातील मनुष्याने जन्म घेतला. त्यांनी आरखेड येथील जहंगारी दामाजी आप्पानी स्वीकारावी अशी विनंती केली. संतांना संपत्तीचे काय अप्रूप, हे क्षणिक सुख नको म्हणून अप्पांनी त्या जमिनीचा त्याग करुन अखंड हरीचे चिंतन आणि भजन करायचे असा दृढभाव केला.
'एकतत्व नाम दृढ धरी मना। हरिसी करुणा येईल तुझी।।' याप्रमाणे दामाजी अप्पांनी सर्व संपत्तीचा त्याग करुन गावाच्या पश्चिमेला असलेल्या टेकडीवर विठ्ठल मंदिराशेजारी समोर पिंपळाचे झाड व दूर असणारी गोदावरी माता दृष्टीस पडेल अशा सुंदर वातावरणात योगमुद्रित होऊन ध्यानस्थ झाले. ध्यानमग्न संजीवनी समाधी शके सोळाशे व इसवी सन सोळाशे अष्ट्याहत्तर मध्ये घेतली.
विसाव्या शतकात पालम तालुक्यात संत मोतीराम महाराज अवतरले त्यांनी संतधर्मपरंपरांचे विचार भजन किर्तनाद्वारे लोकांत रुजवण्यास सुरवात केली. गंगारामजी चुडावेकर, पुंडलिक साधु यांच्या मदतीने दामाजी अप्पांच्या महान विचारांचे कार्य त्यांनी पुढे चालु केले.
त्यांच्या प्रेरणेने दामाजी अप्पा यांच्या मंदिरात आषाढी एकादशी पासून पौर्णिमेपर्यंत उत्सव साजरा व्हायला सुरुवात झाली. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महाराजांची पालखीची मिरवुणूक दहीहंडी उत्सवात केली जाऊ लागली.
मोतीराम महाराजांच्या विचारांचा प्रभाव आरखेड येथील शेषेराव मधूजी, धोंडीराम चुडावेकर, बापु महाराज, पांडुरंग महाराज, सीताराम महाराज, छत्रपती दुधाटे या भाविक भक्तावर झाला आणि हा उत्सव अखंड हरिनाम भजन किर्तनाचा सात दिवसांचा सप्ताह चालू झाला.
आशा या महान संतामुळे समाजकार्यास सुरवात झाली. त्यांनी परोपकार, ईश्वरभक्ती, सर्वधर्म समभाव याची भेट देऊन समाजास परोपकृत केले.दामाजी अप्पा यांच्या बद्दल लक्ष्मण गाथा या ग्रंथात उल्लेख आढळतो. अशा या संतांच्या पावन स्मृतीस अभिवादन करुन ईश्वरचिंतनात पांडुरंगास स्मरावे.
पंढरीनाथ महाराज की जय
"आरखेड हे गाव पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो श्री दामाजी अप्पा सुपुत्र।
तया आठविता महापुण्य राशी माझा नमस्कार श्री दामाजी अप्पा चरणाशी।।"
माझे वडील संभाजी गौरप्पा कानगुले यांच्या कथेतील सारांश.

Comments
Post a Comment