#MS #Dhoni.... The hidden truth...by Goroba kangule..
1) 19 मार्च 2000, स्थळ नागपुर, Ind Vs Rsa. आपण 320 धावांचा पाठलाग करताना 27 overs नंतर 1 बाद 193 अशा मजबुत स्थितीत. रिज़ल्ट 10 धावांनी पराभव.
2) 3 फेब्रु 2002, स्थळ वानखेडे IND vs ENG भारताला जिंकण्यासाठी 14 ओवर्स मध्ये 60 रन्स पाहिजे होत्या अन हातात 7 विकेटस शिल्लक.
रिज़ल्ट भारत 5 रन्स नी हरला.
3) 16 मार्च 2004, स्थळ रावळपिंडी Ind vs Pak. जिंकण्यासाठी 330 धावांचा पाठलाग करताना भारत 38 षटकात 3 बाद 245 अशा मजबूत स्थितित पण सचिन आउट झाल्यानंतर 12 रन्स नी हरलो .
ही लिस्ट खुप मोठी आहे, नट्वेस्ट फाइनल सारख्या एक दोन सामन्याचा अपवाद सोडला तर चांगल्या सुरवातीनंतर अन चांगल्या स्थितीत असताना फक्त फिनिश नाही करू शकलो म्हणुन आपण कितीतरी सामने गमावले. पर्थ शारजात तर सचिन बाद झाल्यानंतर आपले वार्टलु झाले. पत्यांच्या बंगल्याप्रमाणे धाराशाही होणारी आपली फलंदाजी पण करोड़ो चाहत्यांची प्रार्थना शेवटी कामाला आली अन भारताला मिळाला एक हिरा ज्याने केवळ भारताच्या नाही तर क्रिकेट जगाच्या इतिहासात आपल्या दैदीप्यमान आगाजाने लक्ष्य वेधुन घेतले.
नव्वदच्या दशकाच्या उत्तरार्धात क्रिकेटचे सामने पहायला सुरवात करणाऱ्या माझ्यासारख्या लाखों चाहत्याना धोनीने भारतीय संघाला काय दिले हे वेगळे सांगण्याची गरज नाही. माझा हा लेख डोळ्यावर पट्टी बांधुन विरोध करणाऱ्या धोनीच्या त्या विरोधकांसाठी आहे जे हारणाऱ्या प्रत्येक मॅच ला धोनी कसा जबाबदार आहे हे दुसऱ्याला सांगण्यात पटाईत असतात.
साधारणत: धोनीचा विरोध करणाऱ्यांची कारणे प्रामुख्याने तीन आहेत
पहिले, त्यांच्या सर्वोत्तम खेळाडुला जग बेस्ट फिनिशर म्हणून ओळखत नाही.
दुसरे, त्याच्या आवडत्या खेळाडुने कोणतीही महत्वाची टूर्नामेंट जिंकली नाही
तीसरे अन सगळ्यात जास्त चालणारे, त्यांच्या आवडत्या खेळाडुला बाहेर केल्यानंतर कर्णधार म्हणुन धोनीने संघात परत घेण्यासाठी 'विशेष' प्रयत्न केले नाहीत.
2007 च्या त्या दुर्दैवी Exit मुळेच कर्णधारपदाची माळ माहिकडे चालुन आली. खरे तर त्यावेळी भारताचा संघ मजबुत होता पण गरज होती एका कणखर संघ नायकाची जो वेळेप्रसंगी कठोर निर्णय घेऊ शकेल. द्रविड, सचिन मंडळी खेळाडु म्हणुन जेवढे महान तेवढेच माणुस म्हणुन(काकणभर सरसच असतील). पण दुर्दैव असे की 'खुप' चांगली व्यक्ती निदान क्रिकेट मध्ये तरी चांगला कर्णधार नाही होऊ शकत कारण टिका सहन करण्याची त्यांच्यात ताकद नसते (दादा अन Ponting कर्णधार म्हणुन खुप मोठे झाले पण त्यांच्यावर टिका पण खुप झाली) पण म्हणतात ना टाकीचे घाव सोसल्यावरच 'देवपण' येते. धोनीवर जितकी जास्त टिका झाली तितकाच तो Strong झाला, त्याला प्राण ओवाळून टाकणारे चाहते मिळाले.
मान्य आहे सध्या धोनी BADPATCH मधुन जात आहे पण त्याचे योगदान विसरून काही लोक फुकटच्या प्रसिध्दीसाठी त्याच्यावर वाटेल ती टीका करत आहेत (कदाचित ही तीच लोकं असावीत ज्यांनी आयुष्यात कधीच अपयश पहिले नाही). फलंदाज म्हणुन पाहताना आपण त्याच्या यष्टीरक्षणातील योगदान पूर्णपणे विसरतो. धोनीने टेस्ट क्रिकेट मध्ये जेव्हा पदार्पण केले तेव्हा सय्यद किरमाणी सारख्या नावाजलेल्या यष्टीरक्षकांने त्याच्या wicket keeping च्या तंत्रावर प्रश्नचिन्ह उभारलेले पण त्यानंतर त्याने स्वतःमध्ये इतकी सुधारणा केली की आज तो जगातील सर्वोत्तम यष्टीरक्षक आहे.
कर्णधार फिनिशर अथवा यष्टीरक्षक फक्त इतकेच धोनीचे यश मर्यादित नाही. त्याच्या यशाने भारतातील लाखों खेळाडूंना एक 'Hope' दिली, एक confidence दिला की क्रिकेट आता केवळ श्रीमंताची मक्तेदारी नाही. इथे छोट्या शहरातील खेळाडु सुध्दा जगातील एक सर्वोत्तम कर्णधार होऊ शकतो इथे एक टिकेट collector सुध्दा ICC च्या सर्व Tournaments जिंकणारा जगातील एकमेव कर्णधार होऊ शकतो ... (काय ही Achievement ) फक्त त्यासाठी लागते महत्वाकांक्षा अन लढण्याची जिद्द. ती जिद्द देणारा, करोड़ों लोकांचे इन्स्पिरेशन असणारा लांबलचक केस घेऊन पदार्पण करणारा माही उद्या 38 वर्षाचा होतोय त्याबद्दल त्याला आभाळभर शुभेच्छा.. तुझ्या यशाची किर्ती अन तुझे विरोधकसुध्दा चकोराप्रमाणे वाढू दे(निंदकाचे घर असावे शेजारी कारण त्यांच्यामुळे मिळणाऱ्या यशाचा आनंद द्विगुणित होतो.) फक्त त्या यशाला आमवस्यारूपी शनीची वक्रद्रुष्टी लाभु नये ही ईश्वर चरणी प्रार्थना.
#HappyBirthdayMSD #MahiDThala

Comments
Post a Comment