Skip to main content

Posts

टाय पे टाय 'अँड थ्रो टू द विनर'

14 जुलै 2019, नेहमीप्रमाणे एकमेकांवर कुरघोडी करण्यात जगातील राष्ट्रे गर्क होती पण इंग्लंड दोन ऐतिहासिक अदभुत अविश्वसनीय आणि अतर्क्य आशा फायनलचे साक्षीदार होणार होते. टेनिस आणि क्रिकेट समर्थक सोडले तर बाकीच्यासाठी हा नॉर्मल दिवस पण ह्या दोन खेळासाठी हा 'गोल्डन डे' होता. एकीकडे पहिल्या विश्वकप साठी लॉर्ड्सवर ब्रिटन न्युझिलंड झुंजणार होती तर वर्ल्ड नंबर वन जोको विरुध्द 38 वर्षाचा तरुण!! फेडरर आपल्या विक्रमी एकविसाव्या ग्रँडस्लॅम साठी खेळणार होता।।। काल पर्यंत अफ्रिका ऑस्ट्रेलिया चा 99च्या सेमिफायनलचा थरार असो अथवा 06 चा वांडरर्स वरील वंडर असो या दोन सामन्यांना इतिहासातील सर्वोत्कृष्ट सामने म्हणून क्रिकेट फॅन्स कधीच नाकारु शकत नव्हते. पण हो फक्त काल पर्यंतच!! शेवटच्या क्षणापर्यंत आणि शेवटच्या चेंडुपर्यंत श्वास रोखणाऱ्या या खेळाने काल परमोच्य आनंद मिळवून दिला. क्रिकेट मध्ये टाय होणारे सामने बोटावर मोजण्याइतके त्यात वर्ल्डकप मध्ये इनमिन चारच. वर्ल्डकपची सर्वात क्लोज फायनल 92 ची पाक इंग्लंड ज्यात यजमानांना सात धावाने पराभव पत्करावा लागला. म्हणजे  फायनल टाय होण्याचा विचार क्रिकेटन
Recent posts

समाधी सोहळा श्री दामाजी अप्पा

"समाधी सोहळा श्री दामाजी अप्पा" महाराष्ट्रात सांस्कृतिक दृष्ट्या भागवत धर्माचे कार्य फार मोठे आहे. या भागवत धर्माचा पाया संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांनी घातला 'ज्ञानदेवे रचिला पाया। तुका झालेसे कळस।।' संत ज्ञानेश्वरांनी सर्वसामान्य जनतेच्या अंतकरणावर वारकरी पंथाचा पगडा बसवला व वैदिक धर्माचे तत्वज्ञान आपल्या अमृत मधुर वाणीने सांगुन सामान्य माणसाच्या निसत्व जीवनाला अध्यात्माची जोड मिळवून दिली. विठ्ठलावर श्रध्दा असलेला हा वारकरी संप्रदाय आषाढी कार्तिकेला नित्यनेमाने पंढरपूरला जातो. 'पंढरिचा वारकरी वारी न चुकू दे हारी।'. आणि ह्याच भक्तीला पुढे करत संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, संत गोरोबा काका, संत जनाबाई या संतानी तेराव्या शतकात समाज प्रबोधनाचे कार्य केले. हीच संत परंपरा सतराव्या शतकात संत तुकाराम, संत एकनाथांनी कळसापर्यंत नेली. याच काळात परभणी जिल्ह्यातील पालम तालुक्यात 'गोदावरी' नदीच्या काठावर असलेल्या 'आरखेड' या लहानश्या टुमदार गावात 'संत दामाजी अप्पा उदयास आले. आरखेड हे गोदावरी व गळाटी नदीच्या निसर्गरम्य संगमावर वसले आहे. पश्चिमेस

अँड थ्रो टू द फायनल

'अँड थ्रो टू द फायनल' का हरलो कसे हरलो ही प्रश्ने सध्या गौण आहेत पण फाईट देऊन हरलो जिंकण्यासाठी सर्वस्व देत हरलो. 28 वर्षानंतर मिळवलेला विश्वकप पुन्हा इतक्या लवकर आणि सहज मिळवायला आपण काही  ऑस्ट्रेलिया नाही पण क्रिकेटच्या पठारावर आपण नवीन महासत्ता म्हणून विश्वास मिळवायला लागलो होतो. ज्याप्रमाणे सुरवात केली लीग मध्ये टॉप राहिलो त्यामुळे हा वर्ल्डकप आपलाच वाटायला लागलेला. त्यात कधी नव्हे ती जगात सर्वोत्तम अशी बॉलिंग लाभली. हॅट्ट्रिक घेणारा शमी टीमच्या बाहेर, कुलदीप बाहेर म्हणजे आपली गोलंदाजी खतरनाकच. त्यामुळे रविवारी होणाऱ्या फायनलची तिकिटे एव्हाना भारतीयांनी घेऊन ठेवली कारण भारत न्युझीलंडविरुध्द हारेल असे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने जरी सांगितले असते तरी कोणीच विश्वास ठेवला नसता. आमच्या कॉलनीत कॉलेज मधला प्रोजेक्टर आणुन रविवारी फायनल बघण्याचा चंग बांधला होता. त्यात काल न्यूझिलंडच्या फक्त 211 च धावा झालेल्या आणि ज्या फॉर्ममध्ये रोहीत शर्मा होता ते पाहून त्याला आणखी एका शतकाची ओढ लागली होती त्याही पेक्षा विराटचे हुकलावणी देणारे शतक पाहण्यासाठी डोळे आसुसले होते. पण कशाचे काय, सुरुवा

आठवणीतला दादा

''आठवणीतला दादा'' . - गोरोबा संभाजी कानगुले 99 च्या वर्ल्डकप चा हंगाम होता, त्यात आज आपली भिडत श्रीलंकेसोबत आमच्या पिताश्रींना व दत्ता आण्णाला क्रिकेटचा थोडाफार नाद असेल पण तसेही क्रिकेट वर्ल्डकपच्या मेचेस भारतात सर्वत्र पाहिल्या जातात त्यासाठी क्रिकेटचे वेड असण्याची गरज नाही. त्यावेळी मला फक्त दोनच नावे माहीत होती दोन S, एक अर्थात सचिनचे तर दूसरे नाव 'प्रिन्स ऑफ कोलकता' गांगुलीचे. पुढे त्या सामन्यात काय घडले ते सर्वश्रुतं आहे. दुसऱ्या दिवशी शाळेत रात्री घडलेल्या Match ची इस्तंभुत कहाणी अन गांगुलीचा 183 धावांचा पराक्रम स्वतः गांगुली असल्याच्या थाटात सर्व मित्रांना रंगवून सांगितला. त्यावेळी मला द्रविड तितकासा ज्ञात नव्हता किबंहुणा द्रविडचे योगदान समजण्याइतपत मी मोठा झालो नव्हतो. अन माझा Hero झाला 'महाराजा गांगुली'. स्नेहशीष या त्याच्या भावामुळेच दादा क्रिकेटमध्ये आला. तो स्वतः डावखुरा असल्यामुळे त्याचे अनुकरण उजव्या हाताच्या सौरवने केले अन भारताला मिळाला आजतागायतचा सर्वोत्तम 'Lefty Batsman'. 1992 ला सौरव भारतीय संघात आला (फक्त नावाला) पण कर्त

MS Dhoni

#MS #Dhoni.... The hidden truth...by Goroba kangule.. 1) 19 मार्च 2000, स्थळ नागपुर, Ind Vs Rsa. आपण 320 धावांचा पाठलाग करताना 27 overs नंतर 1 बाद 193 अशा मजबुत स्थितीत. रिज़ल्ट 10 धावांनी पराभव. 2) 3 फेब्रु 2002, स्थळ वानखेडे IND vs ENG भारताला जिंकण्यासाठी 14 ओवर्स मध्ये 60 रन्स पाहिजे होत्या अन हातात 7 विकेटस  शिल्लक. रिज़ल्ट  भारत 5 रन्स नी हरला. 3) 16 मार्च 2004, स्थळ रावळपिंडी Ind vs Pak. जिंकण्यासाठी 330 धावांचा पाठलाग करताना भारत  38  षटकात 3 बाद 245 अशा मजबूत स्थितित पण सचिन आउट झाल्यानंतर 12 रन्स नी हरलो .    ही लिस्ट खुप मोठी आहे, नट्वेस्ट फाइनल सारख्या एक दोन सामन्याचा अपवाद सोडला तर चांगल्या सुरवातीनंतर अन चांगल्या स्थितीत असताना फक्त फिनिश नाही करू शकलो म्हणुन आपण कितीतरी सामने गमावले. पर्थ शारजात तर सचिन बाद झाल्यानंतर आपले वार्टलु झाले. पत्यांच्या बंगल्याप्रमाणे धाराशाही होणारी आपली फलंदाजी पण करोड़ो चाहत्यांची प्रार्थना शेवटी कामाला आली अन भारताला मिळाला एक हिरा ज्याने केवळ भारताच्या नाही तर क्रिकेट जगाच्या इतिहासात आपल्या दैदीप्यमान आगाजाने लक्ष्य वेधुन घेतले.

अजराज अजिंक्य 'युवराज'

अजराज अजिंक्य 'युवराज' क्रिकेट बोटावर मोजणाऱ्या अवघ्या काही देशात खेळला जातो पण या खेळाने इतके उतुंग अवलीये दिले आहेत ज्यामुळे खेळाचे श्रेष्ठत्व अबाधित राहिले आहे. काळानुरूप प्रकार बदलणाऱ्या या खेळाने माचो, जेटलमन, पुस्तकी किडे, पुस्तकाच्या बाहेर 360 विश्व दाखवणारे, पारंपरिकता जपणारे अनेक लेजन्ड दिले आहेत त्यात संख्येने कमी असणाऱ्या डावखुऱ्यांचा वाट कणभर जास्तच. डावखुऱ्या फलंदाजांना निसर्गतः एक विशिष्ट देणगी लाभली असावी कारण जेवढे स्टायलिश फलंदाज मोजु त्यात प्राधान्याने डावे आले. अगदी धुतलेल्या तांदळात खडे काढावे तितकेच स्टायलिश उजवे मिळतील. आक्रमकता, अविश्वसनीय फटक्यांची खाण बहुदा डाव्यांच्या ओंजळीत टाकताना देव मधुर रसपान करत असावे. अगदी सर गॅरफील्ड सोबर्स पासून, कलाईव्ह लॉयड, अॅलन बॉर्डर, डेव्हिड गोव्हर, ब्रायन लारा, विनोद कांबळी, सनथ जयसूर्या, ऍडम गिलख्रिस्ट, कुमार संघकारा, सईद अन्वर, आपला दादा, बेव्हन अशी कितीतरी नावे आहेत. महानतेच्या बाबतीत नक्कीच सचिन लारा पेक्षा श्रेष्ठ असेल पण लाराच्या खेळाने चक्षु कणभर जास्तच तृप्त होतील. अशा या डाव्यांच्या माळेत भारताचा एक मोती ठाण